आजपासून ‘या’ शाळांची सुट्टी; शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची घोषणा पुढील 4 दिवस School Holiday: Big News

School Holiday: Big News राज्यात प्रकाहर ऊन आणि वाढत्या उष्णतेची लाट चिंतेचे कारण ठरत आहे. नुकत्याच खारघर येथे झालेल्या उष्माघाताने निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, काळजी घ्या असे आवाहन वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून आणि हवामान खात्याकडूनही करण्यात येत आहे. दरम्यान पालकवर्गाकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे. शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात, अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत आहे. वाढत्या उन्हाळ्यात शाळकरी विद्यार्थ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय. त्यापार्श्वभूमीवर आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांना आजपासून ( 21 एप्रिल ) सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.

 School Holiday: Big News महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता गृहीत धरून शुक्रवारपासून ( 21 एप्रिल ) मुलांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. ज्या शाळांचा अभ्यासक्रम अद्याप सुरू आहे, त्या वगळता बोर्डाच्या सर्व शाळांना सुट्टी असेल. 15 जूनला उर्वरित महाराष्ट्र आणि विदर्भातील शाळा 30 जूनला सुरू होतील, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

👉अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👈

  School Holiday: Big News सुट्टीच्या काळात शाळांमार्फत अतिरिक्त वर्ग किंवा उपक्रम राबण्यात येतात. ते सकाळच्या किंवा संध्याकाळच्या सत्रात राबवण्यात यावे. दुपारच्या सत्रात ते घेता येणार नाही. नववी आणि दहावीचे विद्यार्थी वगळता कोणत्याही वर्गाच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलवता येऊ नये. कारण, उष्णतेच्या लाटेचा परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच, मुलांवर सुट्टीच्या काळात अभ्यासाचा बोजा देऊ नये, अशा सूचनाही दीपक केसरकर यांनी दिल्या आहेत.

https://x.com/MahaDGIP/1649075265719668737

हे सुद्धा वाचा: 

 

शाळेत मराठी सक्तीबाबत राज्य सरकारचा यू-टर्न !

 

जास्त फी उकळणाऱ्या खासगी शाळांवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्यात बदल करणार : दीपक केसरकर

 

श्री सेवकांचा मृत्यू अनपेक्षित तापमानामुळे, त्यावर राजकारण योग्य नाही :

दीपक केसरकर

Leave a Comment