DA : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ; जुलै महिन्यापासूनची थकबाकी मिळणार

DA : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ; जुलै महिन्यापासूनची थकबाकी मिळणार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये सरकारने वाढ केली आहे. महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरुन ४६ टक्के देण्यात येणार आहे. जुलै महिन्यापासूनची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे

डीए आणि डीआरमध्ये होणारी वाढ ही प्रत्येक वर्षाच्या जानेवारी आणि जुलैमध्ये होत असते. ऑल इंडिया कन्झूमर प्राईज इंडेक्स आणि कंझ्युमर फूड प्राईज इंडेक्सने जारी केलेल्या सध्याच्या डेटावरुन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दोन्ही भत्त्यांमध्ये ४ टक्क्यांची वाढ होऊ शकते. पुन्हा पुढील १२० दिवसांमध्ये महागाई भत्ता ५० टक्के वाढू शकतो, अशीही शक्यता वर्तवण्यात येतेय.

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्या आधी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कर्मचारी संघटनांची बैठक झाली होती.

 

केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक जुलैपासून चार टक्क्यांची वाढ करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने केली होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य केली असून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १ जुलैपासून ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्यात आला आहे

ही वाढ जुलै ते ऑक्टोबर, २०२३ या चार महिन्यांच्या थकबाकीसह नोव्हेंबर महिन्याच्या वेतनात रोखीने मिळेल. यामुळे सरकारच्या तिजोरीवर दर महिन्याला १८० ते २०० कोटी रुपयांचा बोजा पडेल असे सां

गण्यात येते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

Leave a Comment