Crop Insurance पिक विमा तुमच्या खात्यात जमा झाला नसेल तर लवकर हे काम करा

Crop Insurance नमस्कार शेतकरी बांधवांना तुमचा पीक विमा मिळवण्यासाठी कोणतं महत्त्वाचं काम तुम्हाला करावं लागेल ते पाहूया. २०२३ च्या खरीप हंगामापासून सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू झाली आहे, ज्यामध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. या योजनेनुसार, तुमचा पीक विमा मंजूर झालाय का, किती मंजूर झालाय, कोणत्या खात्यावरती येणार आहे याची माहिती आता मोबाईल नंबर टाकल्यानंतर सहज चेक करता येते. पीक विम्याचे पैसे आता डीबीटी (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवले जातात. जर तुमचा बँक अकाउंट डीबीटी ला लिंक नसेल तर हे पैसे तुमच्या खात्यावर येणार नाहीत.

 

 Crop Insurance मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला तुमचं बँक अकाउंट डीबीटी सोबत लिंक करावं लागेल. आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक करून घ्या. बायोमेट्रिक पद्धतीने पैसे काढणं वेगळं आणि डीबीटी च्या माध्यमातून पैसे मिळणं वेगळं आहे. डीबीटी च्या माध्यमातून येणाऱ्या पैशांसाठी एनपीसीआय (National Payments Corporation of India) सोबत लिंक करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन डीबीटी मॅपिंग किंवा एनपीसीआय सोबत आधार लिंक करा.

👉ज्यांना पिक विमा मिळाला नाही येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती 👈

Leave a Comment