LPG Gas Connection : नमस्कार मित्रांनो भारतात गेल्या काही वर्षांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. घराघरात एलपीजी गॅस सिलेंडर पोहचला आहे. अगदी खेड्यापाड्यात देखील आता गॅसवरच स्वयंपाक केला जातो. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रातील मोदी सरकारने उज्वला योजना सुरू केल्यानंतर देशात गॅस कनेक्शन वाढले आहेत. अनेकांनी उज्वला योजनेअंतर्गत लाभ घेत गॅस कनेक्शन घेतले आहे.
विशेष म्हणजे शासनाच्या माध्यमातून उज्वला योजनेचा लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरवर अनुदानाचा देखील लाभ दिला जात आहे. अर्थातच देशातील गोरगरीब जनतेला अनुदानित गॅस सिलेंडरचा लाभ मिळत आहे. गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळत असल्याने याचा सर्वसामान्यांना फायदा होतोय यात शंकाच नाही.
दरम्यान, गेल्या महिन्यात अर्थातच ८ मे 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून गॅस सिलेंडरच्या किमती शंभर रुपयांनी कमी केल्या आहेत. यामुळे महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्यांना या निर्णयाचा मोठा फायदा झाला असून महिलादिनी झालेल्या या निर्णयाचे अनेकांनी तोंड भरून कौतुक केले आहे.
👉शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा 👈
परंतु गॅस सिलेंडरच्या दरात झालेली कपात ही निवडणुकीनंतर देखील कायम राहणार का हा मोठा सवाल सर्वसामान्यांच्या माध्यमातून यावेळी उपस्थित केला जातोय. दरम्यान घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे.
ती म्हणजे जर घरगुती एलपीजी ग्राहकांनी केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांचे गॅस कनेक्शन रद्द केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलेंडर मिळण्यासाठी देशभरात कंपन्यांनी ई-केवायसी करण्यासाठी सक्तीची मोहिम हाती घेतलेली आहे. ही प्रक्रिया खूपच सोपी देखील आहे.
यामुळे ज्या ग्राहकांनी अद्यापही गॅस सिलेंडरसंबंधीची ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन केले जात आहे. तसेच जे लोक केवायसी ची प्रक्रिया करणार नाहीत त्यांना कदाचित काही दिवसांनी सिलेंडर दिले जाणार नाही.
👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
विना ई-केवायसी गॅस-सिलेंडर पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. खरे तर उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे. यामुळे आता सर्वसामान्य ग्राहकांची केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान जे ग्राहक केवायसी करणार नाहीत त्यांचे कनेक्शन ब्लॉक केले जाणार आहे.
असे निर्देश केंद्र शासनाच्या माध्यमातूनच देण्यात आले आहेत. दुसरीकडे ज्या उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना आता सबसिडीची रक्कम मिळू लागली आहे. केवायसीची प्रक्रिया करण्यासाठी गॅस वितरकाकडे जावे लागणार आहे.
यासाठी आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्डची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर केवायसीची प्रक्रिया पूर्ण होते. यामुळे जर तुम्हीही अजून केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.