Weather Update : परतीच्या पावसाचा धुमाकूळ! राज्यात पुढील 48 तास मुसळधार पाऊस! कोल्हापूरला ऑरेंज, तर पुण्यात येलो अलर्ट

Maharashtra Monsoon Update : हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार, येत्या 48 तासांत महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात पुढील 48 तास मुसळधार पाऊस

‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

आज मुंबईत ढगाळ वातावरण

पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून माघार घेणार

आजचा हवामानाचा अंदाज

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

Maharashtra Monsoon Update : हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार, येत्या 48 तासांत महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Weather Update : राज्यासह देशात गेले काही दिवस पावसाची हजेरी (Monsoon Update) पाहायला मिळत आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास (Return Monsoon) सुरु झाला असला तरी, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.

आजही महाराष्ट्रात जोरदार पाऊस (Maharashtra Weather Update) पडण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवला आहे. काही भागात अतिवृष्टी तर काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. 

आजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी क्लिक करा 👈

हे पण वाचा – आज 8 मे राज्यात वादळी वाऱ्याचा पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज। havaman andaj today live | Weather Update

राज्यात पुढील 48 तास मुसळधार पाऊस

गणेशोत्सवापासून राज्यात पावसाची रिमझिम कायम आहे. गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात पुढील 48 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. कोकण किनारपट्टीसह गोवा, तामिळनाडू केरळ राज्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार, येत्या 48 तासांत महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

 

हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने कोल्हापूरसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सांगली आणि सातारा जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील निवडक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

हे पण वाचा – आज रात्री विजांसह पाऊस, वातावरण बिघडले। Punjab dakh havaman andaj। हवामान अंदाज। #havamanandajtoday | Weather Update

आज मुंबईत ढगाळ वातावरण

 

भारतीय हवामान विभाग (IMD) ने अंदाज वर्तवला आहे की मुंबई आणि आसपासच्या परिसरात आठवड्यात पाऊस विश्रांती घेईल. या आठवड्यात मुंबई शहरासह उपनगरात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळणार आहेत. मुंबईत येत्या काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. या वर्षी मान्सूनचे आगमन होऊनही मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत जून ते सप्टेंबर दरम्यान 13 टक्के जास्त पाऊस झाला आहे.

Leave a Comment