सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता संदर्भात आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी | DA hike
DA hike : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली असून आज महागाई भत्ता वाढी संदर्भात दोन महत्त्वाचे शासन निर्णय निर्मित करण्यात आलेले आहे.
आपले निवृत्तिवेतन धारक कर्मचारी आहेत त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेले आहे. सातव्या वेतन आयोग, पाचव्या वेतन आयोगानुसार आणि सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन करणाऱ्या सर्व निवृत्त वेतनधारकांना आता महागाई भत्ता वाढ फरकासह मिळणार आहे.
Dearness allowance hike
राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना मूळ निवृत्तिवेतन / कुटुंबनिवृत्तिवेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक ०१ जानेवारी, २०२३ पासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर ३८% वरुन ४२% सुधारीत करण्यात यावा. सदर महागाई वाढ दिनांक १ जानेवारी, २०२३ पासूनच्या थकबाकीसह माहे जुलै २०२३ च्या निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.
महागाई भत्ता कॅल्क्युलेटर
शासन निर्णय पाण्यासाठी येथे क्लिक करा 👈
अद्यापही असुधारित वेतनश्रेणीत (पाचव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेत आहेत अशा निवृत्तिवेतन / कुटूंबनिवृत्तिवेतन रकमेवर दिनांक ०१ जानेवारी, २०२३ पासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर २१२% वरून २२१% करण्यात यावा.
हे पण पहा ~ Employees DA hike : खुशखबर ! राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई 4 % वाढ ! वित्त विभागाकडून निधीबाबतचा प्रस्ताव सादर
सदर महागाई वाढ दिनांक १ जानेवारी, २०२३ पासूनच्या थकबाकीसह माहे जुलै २०२३ च्या निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
महागाई भत्ता वाढ शासन निर्णय येथे डाऊनलोड करा – डीए वाढ शासन निर्णय
डीए वाढ अपडेट्स
निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी / कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यांमधील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना वरील निर्णय, योग्य त्या फेरफारांसह, लागू राहील.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करुन शासन असाही आदेश देत आहे की, वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहील.
महागाई भत्ता वाढ व फ
रक कॅल्क्युलेटर येथे पहा