Weather Update राज्यात वाढत्या उष्णतेसोबतच पावसानंही तडाखा द्यायला सुरुवात केलीय. आज हवामानशास्त्र विभागाने राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे.
Weather Update तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रात्रीच्या तापमान वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Weather Update आज राज्यातील धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशीव, चंद्रपुर, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलाय.
👉आजचे हवामान अंदाज पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈
मराठवाडा आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून कर्नाटक, दक्षिण तमिळनाडूपर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.Weather Update
यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज (ता. २०) मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मालेगाव, अकोला, जळगाव, चंद्रपूर, धुळे येथे तापमान ४३ अंशाच्या वर आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा पुन्हा ४२ अंशांपार पोचला आहे. आज (ता. ३०) राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची
शक्यता आहे.